धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे नामकरण अहिल्यादेवी होळकर आवास योजना ; विजय वडेट्टीवार

0

प्रधानमंत्री आवास योजना : शहरी ...

            मुंबई : भटक्या जमाती  प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना या योजनेचे नामकरण आता अहिल्यादेवी होळकर आवास योजना‘ असे करण्यात आले आहेअशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            श्री वडेट्टीवार म्हणालेअहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्षदानशूरकर्तृत्ववानसुधारणावादीकार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धकुशलश्रेष्ठ मुत्सद्दी न्यायप्रिय शासक होत्या. त्यांनी अनेक घाटविहिरीमंदिरेधर्मशाळापाणपोई यांची बांधणी केली तसेच अन्नछत्राची उभारणी केली. सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी वस्त्रोद्योगकुटिरोद्योगास चालना दिली. असे अनेक महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या आणि सर्वच राज्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Rate Card

            अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहिताच्यान्यायाच्या शिकवणुकीला समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही श्री. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.