दोन तासात ‘सारथी’ला मिळाले 8 कोटी रुपये
‘
मुंबई ; मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. यानिमित्ताने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण 2019/प्र.क्र.117/महामंडळे, दि. 9 जुलै 2020 निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.