साहेब ! “आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..!”

0

कोरोनाच्या महामारी संकट मूळ सगळ्याच्या जीवन मरणाचा गाडा आता कुठं न कुठं दिवसेंदिवस स्लोडाऊन झालाय हे नक्की ह्या लॉकडाऊन मुळं प्रशासन आणि सरकारच्या मध्यात जनता पण त्रस्त झाली असेल कदाचीत विचाराने पण त्या भाजीपाला न अर्धी भाकरीपायी कधी न बाजार पाहिलेला माणूस नव्याने गावात आलेल्या माकडागत माणसाची अवस्था होतेय हे नक्की. जागतिक संकट म्हणून नावारूपाला आलेल्या कोरोनाच्या शिकवणीला एक धडा म्हणून जगणं आणि पैसे हेच सर्वस्व नसत आणि श्राधिक भावनेने तयार झालेले देव, धर्म आज निपचीत पडून आहेत हे ही नक्की माणसाला समजलं. सगळ्यात जास्त यात कुणाला त्रास झाल असेल तर स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंब किंवा देवाच्या श्रद्धेला साक्षी ठेऊन मागून खाणाऱ्या किंवा फिरत्या व्यावसायिक , गिसाडी यासारख्या कुटुंबाची फरफड मात्र झाली हे नक्की.चार पैक मिळतील या आशेने आलेल्या ह्या कुटुंबाने आपला संसार उघड्या अभाळखाली मांडला खरं पण कोरोनाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला पोटच्या भाकरीचा तुकडा सुद्धा हिरावून घेतल या कोरोनाने. जगाच्या बाजारात आज प्रत्येक माणूस 4 बुक शिकून स्वतःच्या जीवाला जपायचं म्हणून तोंडाला मास्क आणि काळजी घेताना दिसतोय. 


Rate Card

पण असे कुटुंब, भयभीत होऊन फिरणाऱ्या काही पर्मनंट पाहुणे यांच्या आरोग्याची काळजी आणि पोटाची खळगी याकडे लक्ष कुणाचं गेलं नाही. 

मंत्री न संत्री सगळीजण जनतेच्या विचारानं योजना, धान्य, गॅस , सेवा सुविधा देताहेत. कोरोना पासून जनता वाचली पाहिजे म्हणून प्रशासन आणि सरकार तारेवरची कसरत करत आहे. पण यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. भारत म्हणजे धार्मिक आणि संस्कृतीच्या स्वबळावर स्वार होऊन जीवन जगणाऱ्या देशातला एक देश. पण आज प्रार्थना करायला जाणार मंदिरे पण नाहीत इतकी भयावह परिस्थिती ओढवली आहे. माणुसकी पणाची एक मशाल म्हणून रक्कम शासनाला जमा होतेय पण ह्या गाव गाड्यात राहणाऱ्या व्यावसायिक कुटुंबांना पण आधार हवं. कोरोना मुळ कंपन्या बंद झाल्या खायचं काय म्हणून हतबल झालेल्या लाखो तरुणांनी गावाकडे जायला धूम ठोकली पण अडकले मध्यात. शासन सगळं करतय पण आपल्या देशात आरोपी सारख राहायला लागली ही माणसं. प्रशासन आणि सरकार दिलेलं निर्देश देशाच्या आणि आपल्या जीवासाठी महत्वाच्या आहेत.ते पाळले पाहिजे हे नक्की. पण आज दैवत म्हणून अवरतलेले रस्त्यावरचे देव आणि दवाखान्यात असलेले डॉक्टर यांना ही तात्पुरती जनता आज एवढंच म्हणत असेल की , साहेब ! “आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ..! 

साहेब ! “आमच्या भाकरीची तजवीज पण होऊद्या ओ…!लेखन : पत्रकार एन.के. ( मो. 8806605852)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.