जत तालुका बेकरी असोशियनच्या अध्यक्षपदी विनय अय्यगांर
जत,प्रतिनिधी : जत तालुका बेकरी व स्वीट मार्ट असोशियनच्यया अध्यक्षपदी जत शहरातील प्रसिद्ध बेकरी व्यवसायिक विनय अय्यंगार व उपाध्यक्षपदी मिथून माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महादेव अंदानी, सिध्दू माळी, मिलिंद माने, महादेव बडकुंद्री, यांच्यासह जत तालुक्यातील बेकरी व्यावसायिक उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना विनय अय्यंगार म्हणाले,कोरोनाच्या लॉकडाऊन काळात बेकरी व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. त्याशिवाय ग्राहकही घटला आहे.भविष्यात सर्वाच्या सहकार्यांने या व्यवसायाला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू.