जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथे गुरूवारी पुन्हा 5 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
यामुळे बिळूरची एकूण कोरोना बाधित संख्या आता 26 वर पोहचली आहे.गाव रेडझोन करण्यात आले आहे.
आठवड्यापुर्वी एका इस्ञी व्यवसायिका पासून कोरोनाची ही साखळी वाढत आहे.गावात मोठ्या प्रमाणात या कोरोना बाधिताचा संपर्क आल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.आतापर्यत संपर्कातील सुमारे दीडशे पर्यंत नागरिकांना जत येथे संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वाब कोरोना रुग्ण सापडताच त्यांच्या जवळच्या,लांबच्या संपर्कातील यादी तयार करण्यात येते.त्यात जवळच्या संपर्कातील जत येथे संस्था क्वॉरंटाईन करण्यात येतात.त्याचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात येतात.तर लांबच्या संपर्कातील नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.त्याशिवाय कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.मात्र बाधित रुग्णांची साखळी सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.ग्रामपंचायती कडून सर्वप्रकारे काळजी घेतली जात आहे. औषध फवारणी,स्वच्छता बरोबर प्रशासनाच्या बरोबरीने कोरोनाचा प्रभाव करण्यासाठी मदत करत आहेत.प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर हे सातत्याने बिळूरला भेट देऊन उपाय योजना करत आहेत.गाव पुर्ण कंन्टेनमेंट झोन करण्यात आले आहे.वैद्यकीय उपचार वगळता कोणत्याही परिस्थिती नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरातील गावेही लॉकडाऊन करण्यात आले आहे.
डफळापूर अर्धा दिवस लॉकडाऊन
बिळूरचे अनेक शेतकरी,नागरिक विविध साहित्य खरेदीसाठी डफळापूरात येत असल्याने धोका निर्माण झाला आहे.खबरदारी म्हणून ग्रामपंचायती कडून सकाळी 10 ते 2 या वेळेतच दुकाने उघडण्यासा मुभा दिली आहे. इतरवेळी 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे.