दारूच्या नशेत जतमधील महिलेचे घर पेटविले | एक लाखाचे नुकसान

0
1

जत,प्रतिनिधी : जत शहरातील एका महिलेचे राहते घर पेटवून एक लाख रूपयाचे नुकसान केल्याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी बायडी नाथा कांबळे (वय 32,रा.इंदिरा नगर,जत)हिने फिर्याद दिली आहे.जत पोलीसांनी परशुराम महादेव कांबळे रा.एंकूडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जत शहराच्या बाजूला एमआयडीसी जवळच्या इंदिरानगर येथे बायडी कांबळे या राहतात.ओळखीचा फायदा घेत परशूराम कांबळे हा बुधवारी पहाटे अडीच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आला.त्याने रागाच्या भरात हातातील काडीने घर पेटवून दिले.त्यात घर व घरातील साहित्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.अधिक तपास हवलदार विजय वीर करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here