जतेत बुधवारी कोरोनाचे तीन रुग्ण वाढले | मोबाइल कंपनीच्या एक कर्मचारी बाधित

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बिळूरबरोबर,मेंढीगिरी, (तिल्याळ) आंसगी (जत) असे बुधवारी 3 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

बिळूर येथे कोरोनाचा कहर चालूच आहे,आज बुधवारी बिळूर येथील 39 वर्षाची महिला बाधित आढळली आहे.जत शहरातील एका मोबाइल कंपनीच्या कार्यालयातील मेंढिगिरी येथील 30 वर्षाचा तरूण कोरोना बाधित झाला आहेत.तो मोबाइल कंपनीच्या जत शहरातील कार्यालयात काम करत होता.मोबाईल कार्ड बदलून देणे,रिचार्ज कार्ड विकण्यासाठी त्यांचा अनेक मोबाईल शॉपी मालकांशी संपर्क आल्याचे समोर आले आहे. जत शहरात त्यांच्या संपर्कातील संख्या मोठी असल्याचे कळते आहे.आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

जत पुर्व भागातील (तिल्याळ) आंसगी (जत) येथील 26 वर्षाचा पुरूषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तो मुळ तिल्याळ येथील आहे.कर्नाटकातील 

एका कंपनीत तो नोकरीस होता.तेथे त्याला त्रास होऊ लागल्याने विजापूर येथे दाखल करण्यात आले होते.तेथेही त्यांची प्रकृत्ती खालावू लागल्याने तो स्व:ता मिरज येथील कोविड सेंटर येथे अडमीड झाला होता.तेथे केलेल्या कोरोना तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा संख प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथकांकडून शोध सुरू आहे.

Rate Card

बिळूरची संख्या आता 21 वर पोहचली आहे तर जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 35 वर पोहचली आहे.जतमध्ये कोरोनाचा मर्यादित असलेला कोरोनाचा प्रभाव बिळूरपासून झपाट्याने वाढू लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.