जत,प्रतिनिधी : जतपासून 12 किलोमीटरवर असलेल्या बिळूरमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने शहरात धोका निर्माण झाला आहे.
जत शहरातील कृषी,किराना,कपडे,सह विविध दुकानदारांकडे बिळूरमधील नागरिकांचे ये-जा असते.सध्या बिळूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे कोन कुणाच्या संपर्कात आला आहे.आरोग्य विभागालाही सांगता येत नसल्याने कोरोना साखळी तोडण्यात यश मिळत नाही.त्यामुळे बिळूरमधील नागरिकांचा जत शहरातील वावर व्यापाऱ्यांसह नागरिकांना धोक्याचा ठरत आहे.
शासकीय कार्यालय भितीच्या छायेत
शहरातील विविध शासकीय कार्यालयात धोका वाढला आहे.बिळूरसह तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक शासकीय कामासाठी कार्यालयात येत आहेत.नुकतेच कोडग बिल्डिंग येथे हलविलेले दुय्यम निंबधक कार्यालय सध्या सर्वाधिक धोकादायक बनले आहे.या कार्यालयात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला असून कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले आहे.