जाचक अटींमुळे प्रधानमंत्री फळपीक विम्यापासून शेतकरी राहणार वंचित?

0

 जाचक अटी आणि प्रमाणके बदला आमदार विक्रम सावंत  


कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांना आमदारांनी दिले निवेदन!सोन्याळ,वार्ताहर : प्रधानमंत्री फळपीक विमा योजना अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित विमा योजना समूह क्रमांक 2 सांगलीसह इतर सात जिल्ह्यात  (मृग बहार) 2020-21मध्ये लागू करण्यात आले आहे. फळपिक विमा योजनेतील

प्रमाणके (ट्रिगर)च्या  अतिशय जाचक अटी घातल्यामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यासह इतर जिल्ह्यातील डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.या वर्षी नव्यानेच लागू करण्यात आलेली जाचक अटी रद्द करून पूर्वी लागू असलेले प्रमाणके (ट्रिगर) कायम ठेऊन  फळबागायतदारांना विमा संरक्षण देण्याची मागणी आमदार विक्रमदादा सावंत यांनी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

     

दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेले डाळिंब पीक हे अनुकूल हवामान व  कमी पाणी  आणि खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे पीक आहे. जत तालुक्यामध्ये उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत.डाळिंबीचे क्षेत्र 11 हजार 344.59 एकर आहे.कृषी क्षेत्राच्या उत्पादनवाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. डाळिंबपीक अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होते. अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांचे फळपिकांना हवामान धोक्यापासून विमासंरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होते. त्यासाठी राज्यात पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.सांगली जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीने हे काम हाती घेतले आहे.

    

Rate Card

शासनातील पिक विमा योजनेतून डाळिंब बागेसाठी सुरुवातीला सांगली जिल्ह्याला वगळण्यात आले होते. कृषी विभाग,शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर परत डाळिंबी फळ पिकाचा समावेश करण्यात आला आहे.यावर्षी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात डाळिंबीसाठी प्रतिहेक्टरीसाठी 6 हजार 500 रुपये भरावे लागणार आहे.एकूण विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये करण्यात आले आहे. पिकासाठी विमा कंपनीने हवामान धोका व कालावधी प्रमाणके दिले आहेत. त्यामध्ये जास्त पाऊस व आर्द्रता यात 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत प्रामाणकेची निकष ठरविलेले आहेत. यामध्ये सलग 5  दिवसात 25 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्केपेक्षा जास्त आर्द्रता राहील्यास नुकसान भरपाई रक्कम 10 हजार 400 रुपये देय राहील. सलग 6 दिवस प्रतिदिन 25मि.मीटर पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्केपेक्षा जास्त आद्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 15 हजार 600 रुपये देय येईल. सलग 7 दिवसा प्रतिदिन 25मि.मीपेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास 26 हजार रुपये,सलग 8 दिवसापेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई 26 हजार रुपये देय राहील. या कालावधीत सलग 8 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन 25 मि.मीपेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम52 हजार देय राहिल.

16ऑगस्ट ते30 सप्टेंबर या कालावधीत पाच दिवस प्रतिदिन25 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास नुकसान भरपाई 9हजार 100 रुपये,6 दिवस प्रतिदिन पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई 13 हजार 650 रुपये 7 दिवस प्रतिदिन पाऊस राहिल्यास 22 हजार 750 रुपये देय राहील.8दिवस प्रतिदिन पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई 45 हजार 500 राहील.1 आक्टोंबर ते 15 डिसेंबर  या कालावधीत सलग पाच दिवस प्रतिदिन 25 मि.मीपेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के पेक्षा जास्त आर्द्रता राहिल्यास 6 हजार 500 रुपये देय,सलग 6 दिवस प्रतिदिन पाऊस राहिल्यास 9 हजार 750 रुपये,सलग 7 दिवस पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 16 हजार250 रुपये राहील.सलग 8 दिवस 32 हजार 500 रुपये देय राहील. गेल्या वर्षी 2019मध्ये डाळिंबीसाठी विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्‍टरी 1लाख 21 हजार रुपये एवढी होती. पिकासाठी विमा कंपनीने हवामान धोका व कालावधी प्रमाणके दिलेले होते.15 जुलै ते 15 आगस्ट 2819 मध्ये पावसाचा खंड 20 दिवसापर्यंत राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 5 हजार 500 रुपये, सलग पावसाचा खंड 21 ते 25 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 11 हजार,25 दिवसापेक्षा जास्त राहिल्यास 16 हजार 500 रुपये राहिल

2.5 मि.मीटर पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडला तरी तो खंड समजण्यात येईल.16 आँगस्ट ते 15 आँक्टोबर 2019 ला 20 दिवस नुकसान भरपाई 16 हजार देय,21 ते 25 दिवस 27 हजार, सलग 25 दिवसापेक्षा जास्त नुकसान भरपाई 38 हजार 500 रुपये16 आँक्टोबर ते 31 डिसेंबर 2019 एका दिवसात 45 मि.मी ते 60 मि.मी पाऊस पडल्यास नुकसान भरपाई 11 हजार,60 ते 90 मि.मी  नुकसान भरपाई 27 हजार,एका 90 दिवसात 90 मि.मी पेक्षा जास्त 66 हजार रुपये देय राहिल.

   

परंतु यावर्षी जाचक प्रमाणकेमध्ये बदल केल्यामुळे दुष्काळी भागातील जत,आटपाडी कवठेमहांकाळ डाळिंब उत्पादक पिक विमा योजने पासून वंचित राहावे लागणार आहे.या भागात परतीचा मान्सून पाऊस पडतो. परंतु प्रतिदिन 25 मि.मीपेक्षा अपवादात्मक कालावधीत होतो.जास्त पाऊस याप्रमाणके पेक्षा 2019 प्रमाणे दुष्काळी भागामध्ये कमी पाऊस व पावसातील खंड प्रमाणके देण्यात यावेत.अशी मागणी होत आहे. 

    
“2020 व त्यापुढील दोन वर्षासाठी एकच प्रमाणके दिले आहे परंतु मागील दोन वर्षांमध्ये तीन-तीन प्रमाणके दिले होते. दुष्काळी जत तालुक्‍याचा विचार केला असता सलग पाच दिवस प्रतिदिन 25 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस कधीच झाला नाही.दुष्काळी भागातील डाळिंब पिकवणार्‍या शेतकऱ्यासाठी अन्यायकारक आहे. प्रमाणकेत बदल करावा. तीन ते चार प्रमाणके देण्यात यावा. जास्त पाऊस या प्रमाणकेपेक्षा दुष्काळी भागामध्ये कमी पाऊस व पावसातील खंड प्रमाणके देण्यात यावेत. सन 2018-19 प्रमाणे जास्त पाऊस प्रामाणके करीता पाच दिवस ऐवजी 2018 मधील शासन निर्णयाप्रमाणे आठवड्याचा सरासरी पाऊस पाच ते दहा मिलिमीटर झाल्यास नुकसान भरपाई ग्राहय धरावी अशी मागणी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.” 
 -विक्रमसिह सावंत  आमदार जत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.