नकार स्विकारायला शिका

0

गुंडूकाका माझे वाचक मित्र . ८२ वर्षांचे तरुण मनाचे आजोबा. लेख वाचून आवर्जून फोन करणारे. जीवनातील खाचखळग्यांनी समृद्ध असे जीवन जगलेले गोपूकाका. उतारवयातील एकटेपणाने खचून न जाता आपल्या सारख्या ज्येष्ठ मित्रांसाठी मुनलाइट नावाचा कार्यक्रम घेतात व सर्वांना खळखळून हसवून काही क्षण दुःखाचा नैराश्याचा विसर पडण्यास मदत करतात. गोपूकाकांशी बोलणे म्हणजे सकारात्मक विचारांची पर्वणीच असते.

     इन राहो पे चलते चलते ,ऐसा कुछ हो जात है/

     मनचाह खो जात है, अनाचाही मिल जाता है//

 आयुष्यात नैराश्येत ढकलणारे अनेक प्रसंग येत असतात. खचून हि जायला होते. परंतु त्या प्रसंगातही स्वतःला खंबीर ठेऊन शांत राहण्यास भाग पाडणे हे सर्वात मोठे धाडस आहे. आणि हे धाडस करणारा कधीच स्वताला संपविण्याचा विचार करु शकत नाही.

   सुशांत सिंह राजपूत सारख्या अल्पवयीन नायकाची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. यशाच्या शिखरावर असणाऱ्या माणसाने असे पाऊल उचलणे हे निश्चितच चिंताजनक आहेच. पण तेरा वर्षाचा मुलगा किंवा आठ वर्षाच्या मुलाने असे आपले जीवन संपवणे हे जास्तच भयंकर वाटते. ज्यांनी अजून पुरेसे जग बघितले नाही त्यांना जगण्याचा एवढा कंटाळा का यावा?हे नैराश्य आहे कि नकार पचविण्याचे अपयश ?केवळ मोबाइलला गमे खेळू न दिल्याने स्वतःला संपविण्या इतके टोकाचे पाऊल हि भयंकर चीड या लहानग्यात येते कशी? नक्कीच याचा विचार व्हायला हवा. लहान असो वा मोठे हवे ते मिळवणे, फक्त वरवरचे चकचकीत आयुष्य  जगणे हा जणू ट्रेन्ड होतोय. हाच आदर्श नव्या पिढीसमोर मिळत गेला तर कोठून येईल त्यांच्यात नकार  स्वीकारण्याची समज?मुळात कुणीतरी नाकारणे म्हणजे जगच संपल्यासारखे  नाहीये. अनुभव म्हणून त्यातूनही शिकणे व पुन्हा नव्याने सुरुवात  करणे हे धैर्य अंगी बनवणे महत्वाचे आहे. अनेक मोठं मोठे उद्योजक,शास्त्रज्ञ ,थोर नेते यांच्याही वाट्याला नकार  हा आलाच होता. पण त्यांनी हार मानून स्वतः ला संपवले असते तर आज त्यांचे आदर्श  आपल्या समोर राहिलेच नसते.

    जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जीवनप्रवास वाचल्यास लक्षात येईल किती कठीण प्रसंगातून  ते मोठे झाले होते. दोन महिन्याचे असतानाच आई पासून दुरावले, निग्रो असल्याने अनेक ठिकाणी  उपेक्षा आणि नकार  देणाऱ्या घटना घडल्या, पण जसे नकार देणारे भेटले, तसेच त्यांना स्वीकारणारे व मायेने वाढविणारे हि  भेटलेच. पेला अर्धा रिकामा आहे, यापेक्षा पेला अर्धा भरलेला आहे असा सकारात्मक विचार करून त्यांनी आलेल्या प्रत्येक  संकटातून नव्याने मार्गक्रमन केले म्हणूनच अनेक चमत्कारिक वैज्ञानिक शोध ते  लावू शकले. एवढ्या वर्षानंतरही विज्ञान जगतात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

    आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली कि आपण नाराज होतो त्यातून मग चिडचिड वाढून नैराश्य ग्रस्त होऊन चुकीचे पाऊल उचलले जाते. विनोबा भावे यांनी आपल्या आठवणीत सांगितले आहे कि,”मनाविरुद्ध काही घडल्याने आपण नाराज होतो तेंव्हा  तो क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण असते, परंतु ते  जर जमले तर मात्र माणूस मोठ्या आपत्तीतही शांत  राहू शकतो. विचारपूर्वक उचलेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देतात.

        लॉक डाऊन मध्ये केवढी उलथापालथ झाली,हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणारे अबाल वृद्ध,अपंग माणसे आपण बघितली. एवढ्या कठीण समयी सुद्धा हे हि दिवस जातीन या विश्वासाने त्यांनी मार्गक्रमण केले. पण नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे फारशे दिसले नाही. त्यांच्या कडून हि सकारात्मकता नक्कीच शिकण्यासारखी आहे.

     अनेक मुले मुली गरिबीतून अनंत अडचणीतून  शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान होणारी अनेक उदाहरणे  सध्या आपण पाहत आहोत. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक यशामागे अनेक नकार व अनेक  अपयश पचविलेली मानसिक ताकद असते. म्हणूनच त्या यशाचा आनंद हि तेवढाच मोठा व   समाधान देणारा असतो. अरुनिमा सिन्हा सारखी अनेक प्रेरणा दायी उदाहरणे आहेत, ज्यांनी सर्व संपलाय अशा  अवस्थेतही फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेत आपले स्वप्न पूर्ण केले.

   दोन शेजारणी, अगदी जिवलग मैत्रिणी .अगदी गळ्यात गळे घालणारी मैत्री. परंतु काहीशा क्षुल्लक कारणाने दोघींचे गैरसमज झाले, व त्यातील एकीने नैराश्य ग्रस्त होऊन स्वतःला संपविले. अगदी स्वतःचे घर,मुले यांचा विचार न करता!किती भयानक आहे हे. धावपळीच्या जगात सगळंच चांगले व मनासारखे होईल हे कसे शक्य आहे? माणसाने सतत पाण्यासारखे वाहत राहिले पाहिजे, अनेक अडथळे उसळत पार करून पाण्यासारखे वाहत राहिल्यास आपल्या विचारातील  निर्मळता आपोआप जपली जाईल. परंतु अडथळ्यांना घाबरून तेथेच थांबलो तर विचारांचे डबके तयार  होऊन त्यात विचार कुजत जातींन व दुर्गंधी सुटून आपले जगणेच नकोसे  होईल. ये नही तो और सही म्हणत जगता आले पाहिजे. कारण

       जिंदगी गम का सागर भी है ,डुबके ऊस पार जाणा पडेगा/

काही गोष्टी आवर्जून करूयात-

१}मित्र मैत्रीण जोडा पण जास्त कुणात गुंतू नका.

२}कुणाशीही स्पर्धा करू नका,स्वतःशी स्पर्धा करा.

Rate Card

३}स्वतःवर प्रेम करा.

४}आवडते छंद जोपासा.

४}मन मोकळे करणे शिका.

५)व्यसना पासून दुर राहा.

६}खळखळून हसा.

७}ध्यान धारणा करा.

८}सकारात्मक विचार वाचा.

९}{संगीत ऐका .

१०]यशस्वी माणसांची चरित्रे वाचा.

                                   मनीषा चौधरी

                               नाशिक ; ९३५९९६०४२९

   

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.