जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील गावागावात सुरू असलेली ग्रामपंचायतीची विकास कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.यावर कोणाचेही नियत्रंण नसल्याचे समोर येत आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत लाखो रूपये अशी बोगस,निकृष्ठ कामे करून शासनाचा कोट्यावधीता निधी ढापला जात असल्याचे आरोप होत आहेत.नुकतीच जिल्हा परिषदेचे सा.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार यांनी संख,उमदी येथील तक्रारीवरून दफ्तर तपासणी केली आहे. यात दोषी असणाऱ्यांची दांडी उडण्याची शक्यत वर्तवली जात आहे.
असे असतानाही अनेक छोट्या-मोठ्या गावात लॉकडाऊनमध्ये शितील होताच,रखडलेली रस्ते,पेंग्विन ब्लॉक, बांधकामे सुरू आहेत.मात्र यातील अनेक कामे निकृष्ट होत आहेत.यावर नियंत्रण असणाऱ्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची मिली भगत असल्याने तेरीभी चूप मेरी भी चूप अशी स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारीच ठेकेदार बनत मनमानी कामे करत आहेत,यांची गुणनियत्रंण विभागाचे तपासणी करली अशी मागणी होत आहे.
एका ग्रामपंचायतीत विकास निधीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला
जत पश्चिम भागातील एका ग्रामपंचायतीत स्वच्छता गृह बांधण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.या विकास निधीवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला मारल्याचेही समोर आले आहे.
तक्रार करणाऱ्याला गप्प बसविण्यात आल्याचेही समोर येत आहे. त्याशिवाय अन्य योजनातही घोटाळ्याची मालिका तयार झाल्याचेही समजते.