जत,प्रतिनिधी : उमदी ता.जत येथे विज पडून मुत्यू झालेले बाबालाल मेहबूब शेख यांच्या वारसास शासनाकडून देण्यात आलेल्या मदतीचा धनादेश आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सुपुर्द करण्यात आला.
13 मे 2020 रोजी वादळी पावसात बाबालाल शेख यांच्या अंगावर विज पडल्याने ते मयत झाले होते.संख अप्पर तहसील कार्यालयाकडून तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
त्यानुसार शासनाकडून नैसर्गिक मुत्यू झाल्याबद्दल चार लाख रूपयाची मदतीचा धनादेश मयताच्या कुंटुबियांना देण्यात आला. यावेळी अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,आप्पाराया बिराजदार,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर,उपनिरिक्षक नामदेव दांडगे,निवृत्ती शिंदे,वहाब मुल्ला उपस्थित होते.
उमदी येथील विज पडून मयत झालेल्या बाबालाल शेख यांच्या वारसास मदतीचा धनादेश देण्यात आला.