जत,प्रतिनिधी : जत शहरातील स्मशानभूमीत पाण्याची सोय नसल्याची मुत्यूनंतरही यातना सोसव्या लागत आहेत,साधे अंत्यसंस्काराच्या वेळी लागणारे पाणी घरातून आणण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली होती,याप्रकरणी नगरपरिषदेने तात्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी विरोधी पक्ष नेते विजय ताड यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रकाश माने,किरण शिंदे,संतोष मोटे यांनी शुक्रवारी नगरपरिषदेसमोर ठिय्या मांडला.दरम्यान प्रकरण अंगाशी येण्याची भिती लक्षात येताच नगरपरिषदेकडून तातडीने स्मशानभूमीत कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यासाठी एका कर्मचाऱ्यांची नेमणूक केली.
या प्रकरणी विजय ताड यांनी सस्माशभूमीत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी अनेकवेळा नगरपरिषदेकडे केली होती.गेल्या काही दिवसापासून येथे साधे पाणीही उपलब्ध नसल्याची माहिती शुक्रवारी विरोधी पक्षनेते ताड यांना मिळाली,त्यांनी तातडीने नगरपरिषद कार्यालय गाठत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.