कोरोनामुळे शेतकऱ्यांनचे नुकसान

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात नैसर्गिक आपत्ती व कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,नैसर्गिक आपत्ती व जगभरात थेमान घातलेल्या कोरोना या महाभयंकर संकटामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक हानी झाली असुन शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. जगाचा पोशिंदा

असणारा शेतकरी अडचणीत आल्याने अन्न धान्याचा तुटवडा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात हाहाकार माजेल म्हणून कोलमडलेल्या शेतकरी वर्गाला उभे करण्याची गरज आहे.यांचचा विचार  होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी,अन्य मागण्या अशा, सर्व शेतक-यांची कर्जे माफ करावीत.तसेच नवीन कर्जाची उभारणी करून त्यांना आर्थिक मदत करावी.शेतकऱ्यांच्या मालाचा योग्य वेळेत उठाव करुन त्यांना हमी भाव द्यावा.दुध दरात वाढ करण्यात यावी.शेतक-यांची वीज बोले माफ करावीत. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा.बचत गटांचे कर्ज माफ करावीत.तलावातिं योजनेमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनीचा मोबदला मिळाला नाही तरी तो लवकरात लवकर देणेत यावा.पावसाळ्यात पुर परिस्थीती निर्माण होण्याअगोदर म्हैशाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला द्यावे.

Rate Card

जत तालुक्यातील विविध मागण्याचे निवेदन तहलीदार सचिन पाटील यांना देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.