विजापूर-गुहाघर मार्गाचे काम 18 जूनपर्यत सुरू करा : आ.विक्रमसिंह सांवत

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्यमार्गावरील सोनलकर चौक ते बसवेश्वर चौक दरम्यान प्रलंबित असलेली कामे गुरुवार 18 जून पर्यंत हद्द निश्चित करून कामाला प्रत्यक्ष सुरू करण्याचा सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग,नगररचना, भुमिअभिलेख,राष्ट्रीय महामार्ग या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रितपणे बैठक आज आमदार सावंत यांच्या उपस्थितीत झाली.जत शहरातील काम प्रलंबित राहिलेली अधिकाऱ्यांना एकत्रित येऊन बंद असलेली कामे तत्काळ सुरू करण्याची सूचना केली.

Rate Card

मी स्वतःरस्त्यावर उभारून काम करून घेणार आहे नागरिकांची हाल होता काम नये पावसाळ्यात जत शहरातील नागरिकांना हाल होवू नये यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदाराना दम दिला.

 म्हैसाळ योजनेच्या कँनालच्या जमिन हस्ताहंरण अधिकग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना व तालुकरतील तिकोंडी,बागलवाडी,लकडेवाडी,जिरग्याळ,मुंचडी आदी गावातील तलावात गेलेल्या जमिनीचे भूसंपादन त्यांचे पैसे

देण्यासंदर्भातील अडचणीचा यावेळी महसूल,जलसंपदा,कृषी विभाग उपस्थितीत आढावा घेण्यात आला.सोमवार पर्यत या संदर्भातील तिन्ही विभागांनी एकत्रित अडचणीचे विषय संपविण्याचे प्रयत्न करा, असे आ.सांवत यांनी सांगितले आहे. 

आ.विक्रमसिंह सांवत यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.