संखच्या तरूणांचा कर्नाटकातील अपघातात मुत्यू

0
5

संख,वार्ताहर : संख,ता.जत येथील दिलीप रेवणसिध्द कोरे यांचा कर्नाटक मनगुळी हायवे रोडवर अपघात झाला.

यात दिलीप कोरे याचा विजयपूर येथे दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यु झाला.संख येथील दिलीप रेवणसिद्ध कोरे विजयपूर ते बेंगलुरु या मार्गावरून मनगुळी (कर्नाटक)या हायवेवर  मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला.अधिक माहिती मिळालेली अशी की, दिलीप कोरे कर्नाटक कंपनीत नोकरीस आहे.मनगुळी येथे वाटेत ट्रॅक्टर पंचर झाले होते.


 ते पंचर काढण्यासाठी मनगुळी हायवेकडेला थांबला असता समोरून भरधाव वेगाने कार गाडी व मोटर सायकल येत होती. कार गाडीवाल्याने मोटर सायकलला डिपर दिल्याने हा अपघात झाला.अपघातानंतर त्याला उपचारासाठी विजयपूर दवाखान्यात नेण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.पुढील मोटारसायकल  कर्नाटक येथील विजयपूर(दर्गा)येथील रहीवासी असून त्यालाही जोरात मार बसल्याने जखमी झाला आहे. तोही विजयपूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे. अपघाताची नोंद मनगुळी पोलीस स्टेशनला झाला आहे. पुढील तपास  मनगुळी पोलीस करीत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here