अधिकारी,मुंद्राक विक्रेत्यांच्या संपत्तीची आयकर विभागाकडून चौकशी करावी | युवक राष्ट्रवादीची मागणी

0

जत,प्रतिनिधी : जत तहसिल कार्यालय आवारातील दुय्यम निबंधक, पुरवठा शाखा, सेतु व महा ई सेवा केंद्र, स्टॅम्प वेंडर व इतर कार्यालयात कोरोना संसर्ग

रोखणेसाठी उपाय योजना न करता कार्यालय सुरु केल्याने धोका निर्माण झाला आहे.त्याचबरोबर जमिन खरेदी-विक्रीत अधिकारी,मुंद्राक विक्रेत्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. त्यांच्या बेकायदेशीर संपत्तीची आयकर विभागाकडून तपासणी करावी

त्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जत तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे. जत शहरातील दुय्यम निबंधक,पुरवठा शाखा, सेतु व महा ई सेवा केंद्र, स्टॅम्प व्हेंडर व इतर कार्यालयात सोशल डिस्टसिंग,

थर्मल स्कॅनर व इतर सुविधा सुरु न करता कार्यालय सुरु केलेले आहेत. कोणत्याही

Rate Card

कार्यालयात सीसीटिव्ही कार्यरत नाहीत.

सेतु कार्यालय व महा ई सेवा केंद्रामध्ये विविध दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी

शासनाने ठरवुन दिल्याप्रमाणे दरपत्रक लावले नाही, तसेच सदर कार्यालयात प्रतिज्ञापत्र व दाखलेसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर प्रस्ताव व प्रतिज्ञापत्राची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधीत शासनाच्या दरानुसार पावतीची प्रत प्रिंट होते व त्या रक्कमेची प्रिंटची एक प्रत संबधीत प्रतिज्ञापत्र तसेच दाखल्यावर जोडणे बंधनकारक असते. नियमाप्रमाणे रक्कम घेऊन पावती दिली जात नाही.लोकांकडून जादा रक्कम स्विकारतात व एकाद्या नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करतो,म्हटल्यावर तडजोड करुन तक्रार करु दिली जात नाहीत.

सध्या शासनाच्या नियमानुसार प्रवेशासाठी जातीचे दाखले, उतान्न दाखल्ने, नॉन क्रिमीलिअर दाखले व अनुषंगिक दाखले यासाठी सेतु कार्यालय तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडुन जाणीव पुर्वक कोंडी करुन त्यांना आर्थिक लुटले जाते. या कार्यालयात एजंटचा सुळसुळाट असतो.तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्तासाठी मुंद्राक विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात जादा रक्कमा उकळल्या जातात. सदर रक्कम वरिष्ठ अधिका-यांना द्यावयाची असते,असे विक्रेते सांगतात. त्यांना कोणत्याही प्रकारची पावती देत नाहीत.एका दस्तासाठी मुंद्राक विक्रेते 15 ते 20 हजार रुपये शेतकऱ्यांकडुन उकळतात. पैसे देण्यास शेतकऱ्यांनी टाळाटाळ केल्यास केली तर त्याला साहेबांसमोर उभे करतात व 7/12 व इतर कागदपत्रात त्रुटी काढुन कार्यालयात अपमानीत करुन बाहेर हाकलतात. 

विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सर्व दाखले मोफत मिळावेत,त्यामुळे आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही तात्काळ व्हावी व संबधीतांची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, युवक तालुका अध्यक्ष उत्तम चव्हाण,पवन कोळी तालुकाध्यक्ष विद्यार्थी संघटना, हेमंत खाडे, सागर चंदनशिवे, राहुल बामणे, योगेश एडके, जयंत भोसले, मयूर माने,अमरसिंह मानेपाटील, प्रविण साळे, पंकज संकपाळ,उमेश बल्लारी उपस्थित होते.

जतेतील अधिकारी,मुंद्राक विक्रेत्यांच्या संपत्तीची आयकर विभागाकडून तपासणी करावी मागणीचे निवेदन देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.