जत तालुक्यात 53 जणांचे स्वाब घेतले | आरोग्य विभागाकडून खबरदारी | जतच्या तरूणांच्या संपर्कातील पाचजण निगेटिव्ह

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 10 वर पोहचली आहे.यात आंवढी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मुत्यू झाला आहे. तर अंकलेतील दोघे कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.Ҝ.

Rate Card

जत तालुक्यात मुंबई, पुणे,राजस्थान अशा बाहेरून गावावरून आलेल्या नागरिकांमुळे जतेत कोरोना दाखल झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून पुर्णत: दक्षता बाळगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून तालुक्यात बाहेरून आलेल्या सुमारे 53 जणांचे स्वँब तपासणासाठी मिरज येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.


जत शहरातील एका कोरोना बाधित रुग्णाची आई कोरोना बाधित झाली आहे.तर त्यांच्या संपर्कातील पत्नीसह अन्य चारजणाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 41 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष देऊन आहेत.

तालुक्यात पवनचक्कीवर काम करणारे परराज्यातील कामगार जतमध्ये आल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.