डफळापूर-अंनतपूर रस्त्याचे काम पुन्हा दर्जाहीन
डफळापूर, वार्ताहर : डफळापूर-अंनतपूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दर्जाहीन होत असल्याचे समोर येत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यांची पाहणी करून चांगले काम करावे अशी मागणी होत आहे.

गेल्या अनेकवेळा या रस्त्याचे काम करण्यात आले आहे.वारवांर काम होऊनही या रस्त्यावरील खड्डे पाठ सोडत नाहीत.प्रत्येक वेळी झालेली काम ठेकेदाराकडून कशी केली याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. पुन्हा या खड्डेमय रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मात्र खड्डीकरण करताना या रस्त्याचा पुर्वीचा भाग न काढता थेट वर्ती खडी टाकून त्यावर डांबरीकरणचा स्तर टाकण्यात येत आहे. या कामात डांबर अत्यल्प वापरले जात आहे. त्यामुळे हाही रस्ता पुन्हा उखडणार हे निश्चित आहे. आताच या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
डफळापूर-अंनतपूर रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामात डांबर वापरताना हात आखडता घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
