जत | ग्रामपंचायतीच्या 15 टक्के निधीतून मिळणार जीवनावश्यक वस्तू

0
9

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून मागासवर्गीय साठीच्या 15 टक्के निधीतून मागासवर्गीय कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप होणार,असल्याची माहिती रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली.

कांबळे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मागासवर्गीय समाजातील अनेक कुंटुबिय अडचणीत आले आहेत.त्यामुळे त्यांना मदत व्हावी यासाठी यावर्षीचा ग्रामपंचायतीकडील 15 टक्के निधीतून प्रत्येक गावातील मागासवर्गीय कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूचे किट द्यावे,अशी मागणी जत पंचायत समितीकडे केली होती.

त्यानुसार बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर यांनी यासंदर्भात संबधित अधिकारी, ग्रामसेवकांची बैठक घेतली.त्यात या निधीतून मागासवर्गीय कुंटुबांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय झाला आहे. तसे आदेश बिडिओ कडून प्रत्येक ग्रामपंचायतीना दिले जाणार आहेत.यामुळे अनेक कुंटुबियांना अन्नधान्याची मदत होणार आहे.

कांबळे म्हणाले, यापुढे या मागासवर्गीय निधीतून भांडी,साहित्य घेण्यापेक्षा प्रत्येक गावात वाचनालये काढण्यात यावीत,तेथे समाजसुधारक,स्पर्धा परिक्षांची पुस्तके ठेवण्यात यावित जेणेकरून मागासवर्गीय कुंटुबांतील मुले यशस्वी होण्यास मदत होईल,अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here