शिंगणापूरच्या उपसंरपचपदी आण्णासो दा.पांढरे

डफळापूर, वार्ताहर : शिंगणापूर ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी आण्णासो दादासो पांढरे बिनविरोध निवड करण्यात आली.संरपच आण्णासाहेब पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक बाळासाहेब भोसले यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा संपन्न झाली.यावेळी सदस्य श्रीकांत कांबळे,शालन पांढरे उपस्थित होते.शिंगणापूरचे मावळते उपसंरपच संदिप पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
विरोधी गटाकडे चार सदस्य राहिले.उपसंरपच निवडीतून त्यांनी माघार घेतल्याने अखेर आण्णासो दादासो पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ता.2 मेला उपसंरपच पदासाठी सभा घेण्यात आली होती.त्यावेळी एकच अर्ज आला होता.कोहरम अभावी ही सभा रद्द झाली होती.शनिवार ता.6 रोजी पुन्हा ही सभा घेण्यात आली.
निवडीनंतर सोशल डिस्टन्सिंग पाळत आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान उपसंरपच आण्णासो दा.पांढरे,
जवान पांडूरंग श्रींमत पांढरे यांचा व एसटी डायव्हर रावसाहेब बापू पांढरे यांचा सहपत्नी सेवानिवृत्ती निमित्त यावेळी शाल,श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.माजी संरपच आबासाहेब पांढरे,आंनदा पांढरे,बबन लवटे,रावसाहेब हजारे,शंकर मुकदम,एम.एम.पांढरे,सुरेश नाटेकर,पी.एस.पांढरे,रावसाहेब पांढरे,नानासाहेब पांढरे,सुनिल पांढरे आदी उपस्थित होते.
शिंगणापूर ता.जत उपसंरपचपदी आण्णासो दा.पांढरे यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.