सोंनदनजिक अपघातात बेंळूखीतील सात वर्षीय मुलगा ठार

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बेंळूखी येथील घरी कडलास येथून देव दर्शन करून शनिवारी पहाटे दुचाकीवरून येत असलेल्या दांपत्याला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली.यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.शिवम भाऊसाहेब चव्हाण (वय सात, रा. बेळंकी, ता. जत, जि. सांगली) असे उपचारापूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.तर दुुचाकीवरील भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (वय 40),पत्नी रूपाली भाऊसाहेब चव्हाण (वय 35) व मुलगा ओम भाऊसाहेब चव्हाण (वय तीन, रा.बेंळूखी) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटना शनिवार ता.6 ला सकाळी सातच्या सुमारास सोनंद (ता. सांगोला) येथे घडली.

अधिक माहिती अशी,मुळ बेंळूखी येथील असलेले भाऊसाहेब तुकाराम चव्हाण हे शुक्रवारी रात्री कडलास ता.सांगोला येथील दत्त दर्शनासाठी गेले होते.शनिवारी सकाळी ते बेंळूखीकडे (ता. जत) पत्नी व दोन मुलांसह येत असताना वाटेत सोनंद चौक (ता. सांगोला) येथे जतकडून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकचालकाने चुकीच्या पद्धतीने स्प्लेंडर दुचाकीस जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरचे शिवम चव्हाण, रूपाली चव्हाण, ओम चव्हाण गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर 108 ऍम्बुलन्समधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेताना शिवम चव्हाणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर रूपाली चव्हाण व ओम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सुदर्शन केशव चव्हाण यांनी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक न थांबविता ट्रकसह पसार झाला.दरम्यान शेतमजूर असलेल्या भाऊसाहेब चव्हाण यांच्या मुलांच्या दुर्देवी मुत्यूची बातमी बेंळूखीत कळताच हळहळ व्यक्त होत आहे. शेतमजूर असलेले भाऊसाहेब व त्यांच्या पत्नीसह दुसरा मुलगाही गंभीर जखमी आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.