जत शहरात नगरसेवकासह 28 कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात | सर्वांना केले होम क्वॉरंटाईन

0

दारू दुकान,खानावळ,किराणा दुकानही सील

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडताच प्रचंड सतर्कता बाळगली जात आहे. रुग्ण सापडलेल्या शेगाव रोडवरील झोपडपट्टी परिसर सील केला आहे.त्याचबरोबर झोपडपट्टीसह परिसरासह विठ्ठल नगर परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. सर्वाधिक धक्कादायक म्हणजे या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने जत नगरपरिषदेच्या एका नगरसेवकांसह त्यांच्या कुंटुबीयांना होम क्वॉरंटाईनमध्ये करण्यात आले आहे.त्याशिवाय बाधित रुग्णाच्या नात्यातील सहा जणांना जत येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

रुग्णाच्या संपर्क आल्याने एक दारू दुकान,खानावळ,किराणा दुकान दक्षता म्हणून सील करण्यात आले आहे.

जत शहरातील हा ट्रँव्हल ड्रायव्हर खलाटीतील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना बाधित झाला आहे.

जत शहरात या डायव्हरचा मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याने मोठ्या प्रमाणात भिती बाळगली जात आहे.

जत शहरही पुढील चार दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.