कोरोना सुरक्षितेचे नियम पाळत झाले डॉ.सागर पाटील यांचे “शुभमंगल सावधान”
संख,वार्ताहर : लग्न म्हणाले कि झगमगाट, बॅड बाजा यासह सर्वकाही जोमात वातावरण पण सध्या परिस्थित कोरोनाच्या संकटामुळे ‘धुमधडाका लग्नाला ब्रेक ‘लागला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जगाच्या पाठीवर अनेक बदल झालेले दिसत असतांना आता लग्न सोहळेही अतिशय साध्या पद्धतीने होत आहेत.

असे लग्न करणारे कुटुंब हे साध्या पद्धतीने विवाह सोहळे साजरे करुन समाजापुढे निश्चित एक वेगळे आदर्श निर्माण करीत आहेत.असाच एक लग्न सोहळा जत तालुक्यातील संख येथे अतिशय साध्या पद्धतीने पार पडून तो तालुकाभर कौतुकाचा विषय ठरला आहे. संख येथील कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत पाटील,प्राध्यापक आर.बी.पाटील यांचे पुतने डॉ.सागर शिवगोंडा पाटील व प्रिती यांचा लग्न सोहळा संख येथील पाटील हॉटमिक्स प्लँन्ट येथे प्रशासनाचे सर्व नियम पाळत उत्साहात संपन्न झाला.
या लग्न सोहळ्यात उपस्थितांना मास्क आणि सँनीटाइजर वाटप करण्यात आले. अगदी शिस्तबद्ध आणि प्रशासनाने ठरवून दिलेले सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून लग्न सोहळा झाल्याने समाजात एक आदर्श निर्माण झाला आला आहे.
संख ता.जत येथे डॉ.सागर पाटील व प्रिती यांचा विवाह संपन्न झाला.