येळदरीत ट्रँक्टर पलटी होऊन एकजण ठार
जत,प्रतिनिधी : येळदरी ता.जत येथे ट्रँक्टर पलटी होऊन 19 वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायकांळी घडली.सुरज म्हाळाप्पा सरगर वय 19,रा.येळदरी असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,सुरज सरगर हा शुक्रवारी सायकांळी ट्रँक्टर घेऊन शेताकडे चालला होता.दरम्यान वाटेत ट्रँक्टर पलटी झाला.त्यात तो ट्रँक्टरखाली फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती.त्याला तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले,मात्र तत्पर्वीच त्यांचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.जत पोलीसात या घटनेच्या नोंदीचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.
