जत,डफळापूरकर आतातरी शहाने होणार का ?
जत,प्रतिनिधी : जत व डफळापूर पासून प्रत्येकी दहा किलोमीटरवरील खलाटी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने दोन्ही शहरात बोध घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन्ही शहरात गेल्या काही दिवसात कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.दररोज नागरिकांच्या तुफान गर्दीने धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.स्थानिक प्रशासनाने दिलेले नियम पायदळी तुडवत दुकान चालकाकडून अशा गर्दीला खतपाणी घातले जात आहे.

शहरात गेल्या चार दिवसात तर तूफान गर्दी वाढली आहे.स्थानिक स्वंय घोषित नेत्यांकडून नियंत्रण ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काम करणाऱ्या पोलीसाच्या अंगावर जाणाचा काही नेत्याकडून प्रयत्न केला जात आहे.आता हे सर्व प्रकार थांबवून एकझूट होत कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.