कोरोनाचे संकट हटेपर्यत शाळा सुरू करू नयेत : विकास साबळे
जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूचे मोठे संकट भारतात काय आहे.महाराष्ट्रातही त्यांचा फैलाव झपाट्याने होत आहे.जत तालुक्यातील कोरोनाचा शिरकाव झालेला आहे.कोरोनाची सर्वत्र भिती असताना जि.प.माध्यमिक शाळा चालू करण्याच्या हालचाली चालू आहेत.मात्र यामुळे मुले एकत्र येऊन कोरोना वाढू शकतो.त्यामुळे कोरोनाचे समुळ नष्ट होईपर्यत शाळा करू नयेत अशी मागणी,रिपाइचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
साबळे म्हणाले,शासनाकडून कोरोनाचा प्रभाव रोकण्याचा प्रयत्न योग्य व कौतुकास्पद आहे.
मात्र विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या शासन स्तरावर शाळा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त आहे.यात 1 ते 4 थी पर्यत विद्यार्थी हे लहान असल्याने जर कोरोनाचा फैलाव झाला तर सर्वाधिक धोका त्यांना बसू शकतो.त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी एकत्र खेळणे,शाळा सुटल्यानतंर पालकासह हे विद्यार्थी एकमेकाच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल.

त्याशिवाय मध्यान्ह भोजन,स्कूल बस,खाजगी गाड्या यामुळे विद्यार्थी सर्वाधिक संपर्कात येऊ शकतात.शासनाने आतापर्यत कोरोणा रोकण्यासाठी केलेल्या चांगल्या प्रयत्नावर यामुळे पाणी फिरू शकते.त्यामुळे कोरोनाचे संकट हटेपर्यत शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेऊ नये असे साबळे म्हणाले.
शासनाकडून ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे.मात्र जतसारख्या ग्रामीण व डोंगराळ भागात मोबाईलची रेंज नसल्याने असा अभ्यास करणे शक्य नाही.सध्या शासनाने किमान पहिली ते चौथीपर्यतची शाळा सर्व स्थिती पुर्वपदावर आल्यानंतर सुरू करव्यात असेही साबळे म्हणाले.