आंवढीत आणखीन एकजण कोरोना बाधित | जिल्ह्यात नवे 9 जण कोरोना बाधित

0

सांगली : सांगली जिल्ह्यात आज  सायंकाळी ८ वाजेपर्यंत 9 जण कोरोणाबाधित झाले असून उपचारा खालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे . तर दोन रुग्ण कोरोणा मुक्त झाले आहेत. 

यात जत तालुक्यातील आंवढी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील एक जण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे आंवढीतील कोरोना बाधित रुग्णाची संख्या चार झाली आहे.

आज (ता.1 जून )नवे नऊ रुग्ण कोरोणा बाधित झाले असून यामध्ये मणदुर तालुका शिराळा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील चार व्यक्ती (45 वर्षाचा पुरुष,38 वर्षांची महिला,21 वर्षाचा मुलगा,18 वर्षाचा मुलगा कोरोना बाधित झाला आहे.

Rate Card

नेर्ली तालुका कडेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील दोन व्यक्ती रुग्णाची पत्नी वय 51,मुलगी वय 25 तर तालुका शिराळा येथील 48 वर्षाचा पुरुष,शेटफळ तालुका आटपाडी येथील 39 वर्षाचा पुरुष,औंढी तालुका जत येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकजण वय वर्ष 30 यांचा समावेश आहे.

रिळे तालुका शिराळा व शेटफळे तालुका आटपाडी या दोन ठिकाणी आज नवीन कंटेनमेंट झोन सुरू करण्यात येत आहेत. तर अन्य ठिकाणी यापूर्वीच कंटेनमेंट अजून सुरू झालेले आहेत.ज्या चार रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.यामध्ये औंढी तालुका जत येथील 55 वर्षाचा पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेंजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे.त्यांचा प्रकृती अजूनही स्थिती चिंताजनकच आहे.

कडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षाचा पुरुष ऑक्सिजन’वर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षाचा पुरुष रुग्णावर सद्यस्थितीत नॉन-इनव्हेंजीव व्हेंटिलेटरवर उपचार अजूनही सुरू असून प्रकृती स्थिर आहे.मनदुर तालुका शिराळा येथील 81 वर्षाचा पुरुष नॉन-इनव्हेंजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून प्रकृती स्थिर आहे.तर सोहली तालुका कडेगाव येथील 54 वर्षे पुरुष व आटपाडी येथील 57 वर्षाचा पुरुष आज कोरोना मुक्त झाला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली आहे.दरम्यान आंवढी सह रुग्ण सापडलेल्या गावात आरोग्य विभागाची पथकाकडून नागरिकांची दररोज तपासणी करण्यात येत आहे.गाव सील केले आहे.

आंवढी हायरीस्कआंवढी ता.जत येथे मुंबईहून आलेले तिघेजण कोरोना बाधित सापडले होते.त्यानंतर त्यांच्या संपर्कातील 17 जणांना जत येथे संस्था क्वारंनटाईन करण्यात आले होते.त्यापैंकी एकजण कोरोना बाधित झाला.अन्य काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.त्यामुळे आंवढीत संपुर्ण दक्षता घेण्यात येत आहे. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.