शेगांव तीन दिवस लॉकडाऊन
शेगांव,वार्ताहर : आंवढी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील काहीजण शेगाव मधील असल्याने दक्षता म्हणून शेगाव पुढील तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती संरपच धोंडिराम माने यांनी दिली.

आंवढीपासून शेगाव जवळ आहे.त्यामुळे कोरोनाचा धोका होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार हा बंद पुकारण्यात आला आहे.त्यामुळे 29 मे ते 1 जूनपर्यत गाव बंद राहणार आहे.