डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या तरूणाचा मुत्यू
जत,प्रतिनिधी : बिंळूर ता.जत येथील किरण रामाणा प्रधाने(रडरटी) वय 22 याचा विजेचा धक्का लागून मुत्यू झाला.

किरण हा बिएएमएसचे शिक्षण घेत होता.लॉकडाऊन असल्यामुळे तो बिळूर या गावी आला होता.मंगळवार ता.28 खलाटी येथील शेतातील द्राक्षबागेत पाणी पाजण्यासाठी गेला असताना किरणला विजेचा धक्का लागला.त्यात त्याचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.या घटनेने बिळूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
