वाळेखिंडीत पाण्यात बुडून बालकाचा मुत्यू
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वाळेखिंडीत विहिरीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज (ता.29) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
यश सतिश तोरणे (वय 8, रा.आंवढी)असे मयत बालकाचे नाव आहे.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मुळ आंवढी येथील यश व त्याचे आई-वडील लहान भाऊ वाळेखिंडी येथे मामाच्या गावी आले होते.दरम्यान त्याचे आजोबा,मामा,आई-वडील गुळवंची रोडवरील शेतात शेंगा काढण्यासाठी गेले होते.तेथे सर्वजण कामात गुंतले होते.तर यश व त्याचे मामे भाऊ खेळत होते.

दोघे तहान लागली म्हणून जवळच्या सामाहिक विहिरीत पाणी आणण्यासाठी गेले,असता यशचा पाय घसरून तो विहिरीत पडला.ते पाहताच मामेभाऊ ओरडत पळत घरच्यांना सांगण्यासाठी गेला.घरचे लोक येईपर्यत यशचा मुत्यू झाला होता.घरच्या लोकांनी त्याचा मृत्तदेह पाण्याबाहेर काढत जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला घोषित केले.दरम्यान खाजगी वाहनाचे चालक असलेले सतीश तोरणे यांना दोन मुलगे आहेत.यश त्यांचा मोठा मुलगा आहे.त्याच्या पत्नीचे गाव वाळेखिंडी आहे.शुक्रवारीही ते वाळेखिंडीला आले होते.दरम्यान शेतातील काम करण्यासाठी सर्वजण शेतात आले होते.दुर्देव्याने यश विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्याने त्याचा दुर्देवी अंत झाला.
