आंवढीचा एकजण कोरोना बाधित | जिल्ह्यात नवे 8 रुग्ण, संख्या 51 वर
सांगली : सांगली जिल्ह्यातील जतच्या आंवढी येथील मुंबईहून आलेला एकजण कोरोना बाधित आढळल्याने पुन्हा दक्षिण भाग हादरला आहे.जिल्हात कोरोनाचे अर्धशतक पूर्ण,आणखी 8 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.मुंबईहुन व मुंबईच्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत.
जतच्या आंवढी येथील 1 ,खानापूरच्या करंजे येथील ,कडेगावचे नेर्ली येथील 1, आंबेगाव येथील 2 ,शिराळयाच्या रेड येथील 1,खिरवडे येथील 1 आणि तासगावच्या कचरेवाडी येथील 1 अशा एकूण ८ जणांचा समावेश आहे.

तर कडेगावच्या सोहोली येथील 54 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली.
दरम्यान सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे अर्धशतक पार,ही संख्या 51 वर पोहचली आहे.यासर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.