खैरावमध्ये लाडग्यांचा हल्ला | 12 शेळ्या दगावल्या : सव्वा लाखाचे नुकसान
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील खैराव येथे लांडग्यांच्या हल्ल्यात तुकाराम टोणे व कृृष्णा क्षीरसागर या दोन शेतकऱ्यांच्या 12 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यात सुमारे सव्वा लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.खैराव परिसरात मोठ्या प्रमाणात पशूपालन व्यवसाय केला जातो.शेळ्या-मेढ्या पाळणारे शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणात आहेत.तुकाराम मोटे व कृष्णा क्षिरसागर या शेतकऱ्यांचे शेळ्या-मेंढ्याच्या कळपात लांडग्याने अचानक हल्ला करत 12 शेळ्यांचा चावा घेतला.
त्यात बारा शेळ्याचा मृत्यू झाला.यात सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.

पशु वैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला आहे. त्यांचा अहवाल वनविभागाकडे आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवेढापासून हा डोण परिसर असल्याने वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात लांडग्याना खाद्य मिळत नसल्याचे ते लोकवस्तीत हल्ला करत आहे.यापुर्वी बेवनूर,मुंचडी,पाच्छापूर परिसरात लांडग्याने शेळ्या-मेढ्यावर हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत.या लांडग्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.