शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे | कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेची मागणी

0

जत,प्रतिनिधी : राज्यात सध्या कोरोना (कोविड 19) मुळे शेतकरी आणि शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतीपंप वीजबिल माप व्हावे,या मागणीचे निवेदन कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना (महाराष्ट्र राज्य)यांच्याकडून आमदार विक्रमसिंह सांवत यांना देण्यात आले. यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आ.सांवत यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.

यावेळी जत तालुकाध्यक्ष प्रदिप नागणे,कार्याध्यक्ष संग्राम शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत आज वैश्विक महामारीच्या संकटाला तोंड देत आहे.समोर बाजारपेठा खुल्या नसल्या कारणाने असंख्य शेतकऱ्यांना शेतीमाल शेतातच कुजून गेला आहे.शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक मिळकतीचे मार्ग खुंटले आहेत.अश्यातच शेतीपंपाची येणारी मोठ्या रक्कमांची विजबिले गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत आहे.कोविड 19 च्या या संकटात घरखर्च सांभाळून शेतीपंपाच्या विजबिलाच्या खर्चाचा मेळ घालणं शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं आहे.


Rate Card


अशा या संकटाच्या काळात लॉकडाऊन च्या कालावधीतील साधारणतः तीन महिन्यांची शेतीपंपाची विजबिले माफ करणेत यावेत अथवा अर्थव्यवस्थेचा विचार करता निदान निम्मी सवलत तरी देणेत यावी,या निर्णयाने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे,सांगली जिल्हा अध्यक्ष विश्वजित पाटील,जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिंदे,प्रवक्ता ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. जत : शेतकऱ्याचे वीजबिल माफ व्हावे,या मागणीचे निवेदन कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने आ.सांवत यांना देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.