मौजे वाळेखिंडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली : जत तालुक्यातील मौजे वाळेखिंडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – जत तालुक्यातील मौजे वाळेखिंड येथील 1) वाळेखिंड गावामधील भेजलिंगनगरचे उत्तरेकडे डोंगरगाव जत रस्त्यावरील काशीनाथ विश्वास उबाळे यांचे जमीनीपर्यंत 2) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे ईशान्य दिशेला दादासो ज्ञानू पवार यांचे जमीपर्यंत 3) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे पूर्वेकडील राजाबाई नाथा कदम यांचे जमीनपर्यंत 4) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे आग्नेय दिशेला विजय प्रभू कदम यांचे जमीनीमधील विहिरीपर्यंत 5) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे दक्षिणेकडील वाळेखिंड भोजलिंगनगर रस्त्यावरील महादेव यशवंत शिंदे यांचे घरापर्यंत 6) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे नैऋत्येकडील डोगरगाव जत रस्त्यावरील शिवाजी रामचंद्र शिंदे यांचे जमीनीपर्यंत 7) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे पश्चिमेकडे मराठे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संभाजी अमृता मराठे यांचे जमीनीपर्यंत 8) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे वायव्य दिशेला सुरेश भालचंद्र शिंदे यांचे जमीनीपर्यंत या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे – जत तालुक्यातील मौ वाळेखिंड येथील 1) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे उत्तरेकडे डोंगरगाव जत रस्त्यावरील पतंग शिवदास काटकर यांचे जमीनपर्यंत 2) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे ईशान्य दिशेला गळवेवाडी डोगररस्त्यावरील नामदेव कृष्णा हिप्परकर यांचे जमीनीपर्यंत 3) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे पूर्वेकडे लोणारवाडी येथील जि. प शाळेपर्यंत 4) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे आग्नेय दिशेला सिंगनहळ्ळी वाळेखिंड रस्त्यावरील श्रीमंत दगडू टोणे यांचे जमीनीपर्यंत 5) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे दक्षिणेकडील वाळेखिंड रस्त्यावरील संजय संताजी चव्हाण यांचे जमीनीपर्यंत 6) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे नैऋत्येकडे काशिलिंगवाडी वाळेखिंड रस्त्यावरील पांडुरंग परसु शिंदे यांचे जमीनीपर्यंत 7) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे नैऋत्येकडे गुळवंची रस्त्यावरील विक्रम भाऊसो पाटील यांचे जमीनीपर्यंत 8) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे नैऋत्येकडे वाळेखिंड बेवनूर रस्त्यावरील श्रीमंतसोपान सुर्यवंशी यांचे जमीनीपर्यंत 9) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे पश्चिमेकडील जाधववाडी येथील माणिक भिमराव शिंदे यांचे जमीनीपर्यंत 10) वाळेखिंड गावामधील भोजलिंगनगरचे वायव्य दिशेला नामदेव सयाप्पा बुरुंगले यांचे जमीनीपर्यंत या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.