मिरजवाडीतील मयत शेतकऱ्यांचे महेश खराडे यांच्याकडून सांत्वन
मिरज,प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या कुटूबियांचे स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी भेट देवून सांत्वन केले.आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या अजीज शेख ,प्रभाकर गायके या सावकारांना अद्याप अटक झालेली नाही,अटक तात्काळ न झाल्यास आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

खराडे म्हणाले,संजय कदम या शेतकऱ्याची केवळ ३२ गुंटे जमीन आहे ही जमीन संबधित सावकारांनी स्वतःच्या नावे करून घेतली दोन लाखाच्या बदल्यात पैसेही घेतले आणि जमीनही नावावर जबरदस्तीने करून घेतली त्यासाठी वारवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या त्यामुळेच जाचाला कंटाळून कदम यांशेतकर्याने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी संबधित सावकाराची नावे लिहून चिठ्ठी लिहिली तरीही गुन्हा दाखल होण्यास चार दिवस लागले गुन्हा दाखल होवूनही आठवडा उलटला तरी अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही अटक होण्यास विलंब का लागतं आहे हा खरा प्रश्न सावकारांना पोलिसाचे पाठबळ आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे
सावकारांना तात्काळ अटक करून जबरदस्तीने घेतलेली जमीन कदम याच्या पत्नीच्या नावे करून द्यावी तसेच तुकडे बंदी असताना ४० गुंठेच्या खाली खरेदी विक्री होत नाही मग ३२ गुंठे जमिनीची ही खरेदी कशी झाली हांसंशोधनाचा विषय आहे यात मिरज सब रजिस्टर कार्यालय ही गुंतले आहे काय याचाही तपास झाला पाहिजे खरेदी नंतर लगेच अजीज शेख यांच्या पत्नीचे नाव लगेच तलाठ्याने कसे चढविले असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे या सर्व बाबीचा तपास होणे गरजेचे आहे या सवकरामुळे एक कु टुभ उघड्यावर आले आहे दोन लहान मुले ,पत्नी आणि छोटेसे झोपडे असा हा परिवार आहे त्यामुळेच सब दिथ सावकाराला तात्काळ अटक करून करून कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल असा इशारा खराडे यांनी दिला आहे
