जत | मुस्लिम बांधवांनी ईद साध्या पद्धतीने साजरा करावा : वहाब मुल्ला

0

उमदी,वार्ताहर : देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून कोणाच्या विषाणूच्या भीतीने उमदी येथे ईद दिवशी नमाज पडण्यासाठी मशिदी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा रमजान ईदचा सण मुस्लिम बांधवांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन काँग्रेसचे जत तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष व जत तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वहाब मुल्ला यांनी संकेत टाइम्सशी बोलताना

केले आहे. जगाच्या सध्याच्या इतिहासातील ही अतिशय दुःखद अशी महामारी फैलावली असून त्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

Rate Card


मशिदींना टाळे लावले असून जुम्माच्या नमाजचा नूर नाहीसा झाला आहे. रमजान मधील खास तराबीची इबादद व खत्मे कुरानची मैफल तसेच शबे कद्रची रौनक मंदावलेली आहे. अशावेळी ईदची खरेदी करणे म्हणजे हा कोणत्या प्रकारचा आनंद आहे. जेव्हा आम्ही या महामारी च्या च्या काळात मशिदीत जाणे सोडू शकतो तर बाजारात जाणे का सोडू शकत नाही. महामारी चे संकट नाहीसे झाल्यावर खरेदी करता येईल म्हणून ईद चे नवीन कपडे, बुट , चपला आदी वस्तू खरेदी करण्यासाठी कोणीही बाहेर पडू नये. सध्या हाच पर्याय आपल्या व देशाच्या भविष्यासाठी गरजेचा आहे. कोरोना विरोधी युद्धाला कोरोना संपेपर्यंत लढा द्यावयाचे आहे. म्हणून अशा संकटसमयी मुस्लिम समाज बांधवांनी बाजारात गर्दी करण्यापेक्षा घरातच राहून साध्या पद्धतीने ईदचा सण साजरा करण्यात प्राधान्य द्यावे असे आवाहन वहाब मुल्ला यांनी केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.