जत,प्रतिनिधी : जत शहरातील एका तीस वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला.
तो रायगड जिल्ह्यातील तळोजा येथून 11 मेला जतमध्ये आला होता.तेव्हापासून त्याला आरोग्य विभागाने होम क्वॉरंटाईन केले होते.आज ता.24 ला चौदा दिवसाचा त्याचा होम क्वॉरंटाईनचा कालावधी संपत होता.त्या दरम्यान चौदाव्या दिवशी त्याला त्रास होऊ लागल्याने जत येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.दरम्यान त्यांचे हीमोग्लोबिन 2.5 च्या खाली आल्याने त्याचा मुत्यू झाला,असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टारांनी सांगितले.
तो गेल्या सहा महिन्यापासून आजारी असल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचा कोरोना मुळे मुत्यू झाल्याच्या चर्चेने शहरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत
मयत इसम हा अनेक दिवसापासून आजारी होता.त्याशिवाय त्यांचा होम क्वॉरंटाईन कालावधी आज पुर्ण होणार होता.त्यांनतर त्याला त्रास होऊ लागल्यानंतर उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.हिमोग्लोबिन 2.5 असा खाली आल्याने त्यांचा मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र कोरोनाने त्यांचा मुत्यू झाला नसल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले,तरीही आम्ही खबरदारी घेत आहोत,असेही पाटील म्हणाले.
आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी
आरोग्य विभागाच्या कोरोना तपासणी पथकाने मयत इसमाची अनेक वेळा तपासणी केली होती.त्यावेळी कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नव्हती.त्यामुळे कोरोनामुळे मृत्यु झाला नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी सांगितले.





