जत,प्रतिनिधी : चिकलगी मठाचे मठाधिपती, आदर्श समाजसेवक हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवस जतमधील दिव्यांगाना जीवनावश्यक किटचे वाटप करून साजरा करण्यात आला.
तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिनी हभप तुकाराम बाबा महाराज, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रभाकर जाधव, जागर फौंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे यांच्या हस्ते दिव्यांगांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बंडगर, शहराध्यक्ष बंडू भजनावळे, अकिल मुल्ला, तुषार कोळी, धनाजी निंबळे, राजू वडतिले, तालुका संपर्क प्रमुख अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रभाकर जाधव म्हणाले, तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या काळात जत तालुक्यात जे काम केले आहे त्याला तोड नाही. तालुक्यातील अधिकारी व जनता यांना साडेसात हजार मास्क वाटप केले. तीन हजार गरीब कुटूंबियांना डाळ, तांदूळ आदी जिवनावश्यक किटचे वाटप केले तर शेतकऱ्यांच्या बांधवर जात त्यांचा भाजीपाला घेत तालुक्यातील पंधरा हजार कुटूंबियांना भाजीपाल्याचे वाटप केले. कोरोनाच्या या कठीण काळात तुकाराम बाबा यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या आदर्श कामाला मनापासून सलाम.
परशुराम मोरे म्हणाले, तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यासह जत शहरातील गोरगरीबांना जो मदतीचा हात दिला आहे तो लाख मोलाचा आहे. जत शहरात जागर फौंडेशनने जे काम हाती घेतले त्या कामाला तुकाराम बाबा यांनी सतत सहकार्य केले आहे. भविष्यातही तुकाराम बाबा यांनी अशाच पद्धतीने समाजकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
समाजकार्य असेच सुरू ठेवणार- तुकाराम बाबा महाराज
दुष्काळी जत तालुक्यातील जनतेची सेवा करणे हेच आपले लक्ष आहे. जतकरांच्या सेवेसाठी आपण समाजसेवेचे हे व्रत अविरत सुरू ठेवणार आहे. दुष्काळ, कोरोना काळात जतकरांना मदत करण्यासाठी अनेकांनी जे सहकार्य केले त्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. भविष्यातही असेच समाजकार्य सुरू ठेवणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी वाढदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
ह.भ.प.तुकाराम बाबांच्या वाढदिनी दिव्यांगांना जिवनावश्यक किटचे करण्यात आले. यावेळी तुकाराम बाबा, प्रभाकर जाधव, परशुराम मोरे आदी.