वाळेखिंडीत एकजण कोरोना बाधित | जिल्ह्यात दिवसभरात ८ जण कोरोणा बाधित | भिकवडीतील वृद्धाचा मृत्यू
सांगली : सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात ८ जण कोरोना बाधित झाले असून यापैकी कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील 65 वर्षीय कोरोणाबाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्ती मुंबईवरून दिनांक 17 मे रोजी जिल्ह्यात आली होती. त्यांना मधुमेह , रक्तदाबाचा विकार होता.
शिराळा तालुक्यातील मोहरेयेथील एक व्यक्ती (५०वर्षे पुरुष) कोरोणा बाधित ठरला आहे .तसेच रेड येथील कोरोणा बाधित महिलेचा निकटवर्तीय नातेवाईक (२० वर्षीय पुरुष)कोरोनाबाधित ठरला आहे
आटपाडी तालुक्यातील चार व्यक्ती कोरोना बाधित झाल्या असून यापैकी सोनारसिद्ध नगर येथील दोन बहिणीं कोरोना बाधित ठरल्या आहेत. यापैकी एकीचे वय २२ वर्ष व एकीचे वय 26 वर्षे आहे . तर पिंपरी खुर्द येथील एक रुग्ण (26 वर्षीय पुरुष) कोरोनाबाधित असून दुसरा आटपाडी येथील (27 वर्षीय पुरुष) कोरोना बाधीत ठरला आहे आहे.

जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील एक व्यक्ती (32 वर्षे पुरुष) ही कोरोना बाधित ठरला आहे.
या सर्व ठिकाणी कंटेनमेंट झोन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात येत आहेत . तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही करण्यात येत आहे .अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ .अभिजित चौधरी यांनी दिली.