तुंगजवळ सात वर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून

0

सांगली :  तुंग ता.जत येथील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघृण खून केल्याचा प्रकार गुरूवार (ता.21) सकाळी उघडकीस आला.ही चिमुरडी बुधवारी

सायंकाळी दुकानात खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती.रात्री उशिरापर्यत तिचा सर्वत्र शोध सुरू होता.गुरूवार सकाळी ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला.

Rate Card

पहिलीत शिकणारी ही सात वर्षाची चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खाऊ आणण्यासाठी जातो  म्हणून गेली होती.त्यानंतर ती उशिरापर्यत घरी परतलीच नाही.त्यामुळे आई-वडील व नातलगांनी रात्री उशिरापर्यत तिचा शोध सुरू होता.मात्र ती सापडली नव्हती.सकाळी पुन्हा तिचा शोध सुरू केला,दरम्यान गावातील वासू पाटील यांच्या ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह दिसला.तिचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.पोलीसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक,फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण करण्यात आले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकांने घटनास्थळी पाहणी केली.ऊसाच्या शेतात गळा आवळलेला चिमुरडीचा मृतदेह पडला होता.तिचाच लेगिन्सने गळा आवळून हा खून झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे.दरम्यान तिच्या डोक्यात मारहाण केल्याचा एक वण्रही आहे.श्वान पथक,स्थानिक माहितीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध पोलीस पथकाकडून सुरू आहे.अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले,पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी तपास पथकांना सुचना देऊन मारेकऱ्यांच्या शोध सुरू केला आहे.दरम्यान चिमुरडीवर अत्याचार झाल्याचाही संशय असून तसा तपास पोलीस यंत्रणाकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.