सांगली जिल्ह्यात कोरोनाचा आणखी 3 रुग्ण तर 3 जण कोरोना मुक्त
सांगली,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा आणखी 3 रुग्ण तर 3 जण कोरोना मुक्त झाले.शिराळा आणि कडेगाव तालुक्यातील 3 जणांना कोरोना लागण झाल्याचे निष्पण झाले आहे.
मुंबईहुन शिराळ्याच्या रेड मध्ये आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर कडेगाव तालुक्याच्या सोहोलीतील मुंबई स्थित कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील सोहोली मधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या तीनवर पोहचली आहे.

दुसरीकडे सांगली ,मिरज आणि गव्हाण येथील 3 कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा पोहचला 20 वर पोहचल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.