बेळोंडगीतील महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाई करा ; सोमनिंग बोरामणी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बेळोंडगी येथे गेले पाच दिवस झाले. बोर्गी सब स्टेशनच्या अधिकारी व बेळोंडगी वायरमनच्या मनमानी कारभारामुळे शंभर हुन अधिक शेतकऱ्यांचे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,तरी संबंधित वरिष्ठांनी त्या दोन अधिकाऱ्यांना चौकशी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बेळोंडगी सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी केली आहे

गेले चार पाच दिवस झाले बेळोंडगी अंतर्गत येणारे बालगाव टीसी किरकोळ नादुरुस्त झाला आहे,तो दुरुस्त करावा म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी विनंती करून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या भागात पाणी असून देखील पिण्यासाठीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुक्या जनावरांची व शेतकऱ्यांची पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहे. बेळोंडगी येथील वायरमन यांनी पूर्णपणे डोळेझाक केली आहे, किरकोळ नादुरुस्त टि.सी. मुळे आज शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.

Rate Card

बोर्गी सबस्टेशनचे अधिकारी,संबधित वायरमन यांची चौकशी करावी व शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे यावी,तात्काळ टि.सी.दुरुस्त न केल्यास उपोषण बसण्याचा इशारा चेअरमन बोरामणी यांनी दिला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.