गोपीचंद पडळकर यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

0

सांगली : भाजपचे धडाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर 

यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.नुकतीच विधान परिषदेसाठी भाजपने त्यांच्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती, त्यात पडळकर यांचा समावेश होता.वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा, भाजपकडून बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणारे पडळकर आता विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करणार आहेत.धडाडी, जिद्द, चिकाटी आणि वक्तृत्वाचे कौशल्य या जोरावर त्यांनी मारलेली धडाडी लक्षवेधी मानली जातेय.पडळकर “रासप’मधून भाजपात आले. लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीतून लढले. त्यांनी तब्बल तीन लाखाहून अधिक मते घेतली. त्यानंतर पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी असल्याने त्यांच्या सूचनेनुसारच त्यांनी विधानसभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात बारामतीमधून लढत दिली. बारामतीत त्यांचा पराभव दिसत असतानाही वरिष्ठांचा आदेश आणि भविष्यातील वाटचाल समोर ठेवून मैदानात उतरले. 

Rate Card

पडळकर यांचे संघटन राज्यभर आहे. तसेच बहुजन आणि धनगर समाजाचे सध्या ते लोकप्रिय नेते आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठांनी पडळकर यांच्या नावाला विधान परिषदेसाठी सहमती दिली होती.अखेर गुरूवारी आमदार गोपीचंद पडळकरसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, डॉ.निलम गोऱ्हे,शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी,राजेश राठोड,प्रविण दटके,रणजितसिंह मोहितेपाटील,रमेश कराड यांची बिनविरोध निवडी झाल्या आहेत.दरम्यान आटपाडी,जत तालुक्यातील पडळकर सर्मथकांनी आंनदोत्सव साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.