रायगड जिल्ह्यातील 50 मजूर आज पाठविणार : तहसीलदार

0

जत,प्रतिनिधी : जतमधून रायगडचे पन्नास कामगार आज एसटी

बसद्वारे रायगडककडे रवाना केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

ते म्हणाले,रायगड येथील सुमारे 50 कामगार जत तालुक्यातील उमराणी,उटगी भागात काम करत होते.लॉकडाऊनमुळे ते दीड महिन्यापासून अडकले होते.

Rate Card

रायगड जिल्हातील माणगाव डेपोच्या तीन बसेस कर्नाटकातील सीमावर्ती गावात तिकडे असलेले मजूर सोडण्यासाठी आल्या आहेत.बस डेपोकडून तहसीलदार पाटील यांना संपर्क करत रायगड भागातील काही लोक असतील तर पाठवावेत,अशा सुचना केल्या होत्या. दोन बस,एक मीनी बसद्वारे हे 50 मजूर सोशल डिस्टन्सिंग पाळत आज पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.