मिरवाड | तलावात आणखीन पाच दिवस पाणी सोडणार ; आ.विक्रमसिंह सांवत यांची शिष्टाई | डफळापूरातील बैठकीत निर्णय

0

जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागातील मिरवाड तलावात पाच दिवस जादा पाणी सोडण्याचे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

जत पश्चिम भागातील डफळापूर,मिरवाड,शेळकेवाडी, कुडणूर गावातील शेतकऱ्यांना या तलावाचा फायदा होतो.सध्या या तलावात देवनाळ कालव्यातून कुंभारीटेक तलाव ते मिरवाड ओढ्यातून पाणी सोडण्यात येत आहे.मात्र गेल्या पाच दिवसात कुंभारटेड तलाव,ओढापात्रातील सहा बंधारे भरून पाणी दोन दिवसापुर्वी मिरवाड तलावात पोहचले आहे.आतापर्यत फक्त 10 टक्के पाणी साठा तलावात झाला आहे.पाणी सोडण्याची मुदत संपल्याने 

अधिकाऱ्यांकडून पाणी आजपासून बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या.मात्र तलावात पाणी साठा कमी झाल्याने पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी आमदार सांवत यांच्याकडे आणखीन काही दिवस पाणी सोडावे अशी विंनती केली होती.त्यानुसार आज रविवार (ता.10)रोजी मिरवाड तलावावर आमदार विक्रमसिंह सांवत यांनी संबधित अधिकारी,शेतकऱ्यांची बैठक घेतली.तेथे पुढे खलाटी पंपहाऊस चालू करणे,  बिळूरला पाणी सोडणे यांचे नियोजन करून सध्या मिरवाड तलावात आणखीन पाच दिवस पाणी सोडवे अशा सुचना मांडल्या.त्यानुसार पुढील पाच दिवस मिरवाड तलावात पाणी सोडण्याचे नियोजन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले आहे.गतवेळचे 5 लाख 90 हजार व आता साधारणत; तीन लाख रूपये  एवढी पाणीपट्टीची रक्कम या भागातील शेतकरी भरणार आहेत.

यावेळी जलसंपदाचे अभिंयते श्री.सुर्यंवशी,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण,विजय चव्हाण,राजकुमार भोसले,भिमराव शेळके,नंदू कट्टीकर,दादा चव्हाण,संजय भोसले,गोविंद शिंदे,अजित चव्हाण, बाळू माऩे,अजित माने उपस्थित होते.


Rate Cardपंधरा दिवसापुर्वी जत येथे झालेल्या आढावा बैठकीत आम्ही मागणी केल्यानुसार आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मिरवाड तलावात पाणी सोडून तलाव भरू असा शब्द दिला होता,तो अखेर दादांनी खरा करून दाखविला आहे.डफळापूर सह मिरवाड,शिंगणापूर, कुडणूर परिसरातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

– दिग्विजय चव्हाण, सदस्य पंचायत समिती


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.