डफळापूरात धोका वाढला

डफळापूर,वार्ताहर : कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या अंकले गावापासून डफळापूर सात किलोमीटर अंतरावर आहे.तेथील नागरिकांचा मोठा संपर्क डफळापूरशी असतो.डफळापूरातील मोठी बाजार पेठेत खरेदीसाठी अंकलेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात.लॉकडाऊन काळात बंद असलेली काही दुकाने परवानगी नसतानाही उघडून सोशल डिस्टन्सिंगचा नियम ढाब्यावर बसविला होता.गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे डफळापूरात संसर्ग होण्याचा धोका बंळावला आहे.ग्रामपंचायतीचे आदेश असतानाही हेकेखोर दुकानदारामुळे डफळापूरात ही असुरक्षितीची परिस्थिती निर्माण झाली आहे.