अंकलेच्या सीमा सील,कंटेनमेंट झोन घोषित
जत,प्रतिनिधी : अंकले ता.जत येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावाच्या सीमा सील केल्या आहेत.अनिश्चित काळासाठी कंटेनमेंट झोन
घोषित करण्यात आले आहे. एकच प्रवेश रस्ता ठेवण्यात आला आहे. फक्त वैद्यकीय विभागाला प्रवेश दिला जात आहे. स्वयंसेवक,शिक्षकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत. आजपासून दररोज गावतील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
मुंबई येथून आलेल्या चौघामुळे अंकले प्रशासनाच्या निगरानी खाली आले आहे.एकजणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कमालीची खबरदारी घेतली जात आहे.पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना जत येथील समाज कल्याणच्या वसतीगृहात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.रुग्णाला सोडण्यासाठी गेलेल्या रुग्णवाहिकेचा चालक,एक कर्मचारी
यांनाही खबरदारी म्हणून संस्था क्वारंनटाईन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

गावातील अन्य काहीजण संपर्कात आले आहेत का यांची तपासणी करण्यात येत आहे.त्याशिवाय संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आली आहे.आज जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,आरोग्य विभागाची टीम भेट देणार आहे.दरम्यान प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी येरेकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील यांनी डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांची बैठक घेतली,आजपासून काय उपाययोजना करायच्या,कोणती खबरदारी घ्यायची यांच्या सुचना दिल्या.संपुर्ण गावातील संपुर्ण नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.यापुढे गावातील सर्व यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यात आहे.गावात येणारे प्रवेश रस्ते बंद करण्यात आले आहे.वैद्यकीय विभागाची पथके आजपासून गावात तपासणी करणार आहेत.