अभिनेता-दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांची नाट्य कला या संदर्भात घेतलेली मुलाखत

0



{{{{   अभिजित झुंजारराव  >>>> प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असलेला अभिनेता – दिग्दर्शक आहे,, आपल्या अभिनव कल्याण या संस्थे मार्फत नवीन रंगकर्मी ना रंगमंचावर सादर करण्यासाठी प्रयत्नशील असतो, आपल्या संस्थेतर्फे विविध प्रयोग करीत वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यात पुढाकार घेत असतो, त्याच बरोबर व्यावसाईक रंगभूमी, मालिका, चित्रपट इत्यादी ठिकाणी काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रंगभूमी हा त्याचा ध्यास आहे. }}}}

Rate Card


सुरुवातीला मला सांग म्हणजे नेहमीचा प्रश्न नाट्यकलेची आवड तुला कशी झाली ?  तुमच्याकडे कुणी नाटकांमध्ये काम करणार होतं का ?  नाट्यकलेचा पाया कसा रोवला गेला याविषयी सांग ?

        खरं सांगायचं तर मी शाळा कॉलेजमध्ये असताना मला ह्या नाट्यकलेची ची विशेष आवड नव्हती,, मला स्टेजवर अभिनय करताना भीती वाटायची,, चार माणसांच्या समोर बोलायची वेळ आली की मला त्यावेळेला खूप दडपण यायचं ,, पण एक दिवस धीर करून मी शाळेच्या संमेलनात भाग घेतला, त्यावेळेला मला एक छोटासा लहान चा डब्बा बक्षीस मिळाला, ही शाळेची आठवण ,,,, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे कुठल्या स्पर्धेत मी भाग घेतला नाही ,  माझ्या घरची जमेची बाजू अशी की माझ्या वडिलांना नाटकाची फार आवड होती,  ते महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये नोकरीला होते,  त्यांच्या ऑफिसच्या नाटकांच्या स्पर्धा होत असत,  त्या स्पर्धा मी नेहमी बघायचं,  वडिलांना रंगमंचावर नाटकात काम करताना बघायचं,  त्यामुळे तसं बाळकडू मला त्यांच्याकडूनच मिळाले,,  ते मला नेहमी सांगायचे अरे तू सुद्धा नाटक कर,,  एक वेगळं करियर म्हणा किंवा आवड जपली पाहिजे ,,, असं त्यांचं म्हणणं होतं,  त्यामुळे एक दिवस मी आमच्या कॉलनी मध्ये मुलांना घेऊन 1 मे रोजी एक नाटक सादर केलं,  त्याला आता जवळजवळ वीस-पंचवीस वर्षे होतील , ते नाटक कॉलनी मध्ये सादर करताना श्रमदानातून आम्ही स्टेट सुद्धा तयार केले होतं,, आजही आमच्या सोसायटी मध्ये ते आहे,, तसं बघायला गेलं तर वडिलांच्या प्रेरणेमुळेच मला या नाट्यकलेची आवड निर्माण झाली,,,,,

तू आत्तापर्यंत केलेल्या दिग्दर्शन विषयी सांग तसेच तुला  कुठल्या प्रकारची भूमिका  करायला आवडेल याविषयी सांग ?

        मी आजपर्यंत जी नाटक किंवा एकांकिका दिग्दर्शित केल्या त्या सगळ्याचं  एकांकिका आणि नाटकं मला जवळची वाटतात,  पण प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे  ” ब्रेकिंग न्यूज ” आणि ” दगड ओठ ” ह्या नाटकांचा ,,,, दगड ओठ मध्ये मी अभिनय सुद्धा केला होता,  भूमिका कोणत्या करायला आवडतील असं तुम्ही म्हणताय तर मला सगळ्यात जास्त विनोदी भूमिका करायला जास्त आवडतात  त्याला माझी पहिली पसंती असते,,,,

बरं ,  तुझं पहिलं व्यावसायिक नाटक,  मालिका किंवा सिनेमा,  कोणता आणि त्यासाठी तुला सहकार्य कोणाकोणाचे मिळाले ?

       मी एकांकिकेमध्ये काम करत असतानाच हळूहळू व्यावसायिक नाटकांमध्ये पण काम करायला सुरुवात केली होती,,  एकांकिका स्पर्धा मध्ये मला पारितोषिकं मिळाली,  त्यानंतर माझं पहिलं व्यावसायिक नाटक ”  शाश्वती ” हे नाटक होते,, या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक पंकज चेंबूरकर,  त्यांनी मला त्यावेळी खूप सहकार्य केलं,  या नाटकांमध्ये स्मिता तांबे  पण काम करायची,  भूषण करंदीकर काम करायचा, मग काही प्रयोग हेमांगी कवी हिने पण या नाटकात काम केलं होतं,,,,

       पहिला सिनेमा म्हणाल तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेला ” रेगे ” हा चित्रपट होता,  या चित्रपटांमध्ये माझं नाव माझ्या काकांनी अभिजीत पानसे न सुचवलं , त्यांनी रीतसर ऑडिशन घेऊन मला या चित्रपटात भूमिका दिली,  त्यानंतर मी”  पोस्टर बॉईज ” आणि  ” पोस्टर गर्ल ” हे  दोन चित्रपट समीर पाटील यांच्याबरोबर केले,  आणि आता नुकतीच एक ,,,  वेब सिरीज ,,,, आली आहे तिचे नाव आहे ” एक थी बेगम ” यामध्ये मी एक भूमिका केली आहे,,  मालिका मी सातत्याने करत होतो गंगुबाई नॉन मॅट्रिक पासून सुरुवात झाली होती,,,,,

तुला मिळालेल्या पारितोषिकांची विषयी काय सांगशील ?

       पारितोषिक याविषयी म्हणाल तर मी सातत्याने काम करीत असल्याने कुठे ना कुठे तरी पारितोषिके मिळत होती , यामध्ये एकांकिका स्पर्धा,  राज्य नाट्य स्पर्धा,  कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा,  असायच्या माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी जी  पारितोषिके होती ती  आज सुद्धा मला ठळकपणे आठवतात,, त्यामध्ये नाट्यपरिषदेचे यांच्या तर्फे ,,  विनोदी अभिनय करता शंकरराव घाणेकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जायचा ,, तो पुरस्कार हा पुरस्कार मला मिळाला होता , त्यावेळी मी चौकातली विहीर ” हे  नाटक केले होते,,  त्यानंतर मी दिग्दर्शित केलेलं नाटक ” लेझीम खेळणारी पोरे ”  ह्या नाटकाला जवळजवळ अडतीस पुरस्कार मिळाले,  या नाटकाचे प्रयोग खूप झाले ,,,  प्रेक्षकांची पसंती हा फार मोठा पुरस्कार आहे,  आजही माझ्या ” अभिनय कल्याण ” या संस्थेच्या मार्फत किमान पंचवीस तीस प्रयोग आम्ही करतोच , आमची ही संस्था महाराष्ट्रभर नाटक करीत असते,,,  त्यामुळे पुरस्कारापेक्षा नाटक लोकांच्या पर्यंत पोहोचणे हे मला महत्त्वाचं वाटतं,, आणि ते गरजेचे सुद्धा आहे,. ” लेझीम खेळणारी पोरं ”  या नाटकाला ,, झी गौरव तर्फे दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला,, मटा सन्मान मिळाला,, मग पुढे या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धे मध्ये, पुरस्कार मिळाला,,,,,

आजच्या व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक याच्याविषयी तुझं मत काय आहे ?

        मी व्यावसायिक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत ती नाटक आणि उत्तम रीतीने सुरू आहेत ” स्ट्रॉबेरी ” आणि ” माकड ” ही दोन नाटकं दिग्दर्शित केली होती,  व्यावसायिक नाटकांमध्ये अनेक उत्तम दिग्दर्शक,  अनेक उत्तम कलाकार,  अनेक उत्तम निर्मिती संस्था,,  आपापल्यापरीने व्यावसायिक नाटक सादर करीत आहेत ,, आणि प्रायोगिक रंगभूमीवर म्हणाल तर या रंगभूमीवर खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत,,,  भारतीय रंगभूमीवर खूप छान प्रयोग होतात,,,, माझ्या  सुदैवाने मला बरेचसे प्रयोग पाहायला मिळाले,  कारण मी प्रायोगिक नाटकाचे  होणारे महोत्सवला   मी  सातत्याने जात असतो तिथे होणारी नाटक बघत असतो,  त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे विषय नाटकांमध्ये येत आहेत ह्याचा मी माझ्या परीने अभ्यास करून,  आढावा घेत असतो आणि त्या विषयांमधून त्या नाटकांमधून मला सुद्धा काही नवीन शिकायला मिळतं,, व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर दोन्ही ठिकाणी काम चांगलं होत आहे कारण मी आशावादी आहे,,,,

तुला लाभलेले दिग्दर्शक आणि सहकलाकार यांच्या काही आठवणी विषयी थोडसं सांग ?

        माझ्या सुदैवाने काय झालं की मला दिग्दर्शक आणि सहकलाकार खूप चांगले लाभले,, पंकज चेंबूरकर यांनी मला त्यांच्या व्यावसायिक नाटका काम दिलं,  खूप सांभाळून घेतलं मृणाल  चेंबूरकर त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं,  त्याशिवाय स्मिता तांबे,  हेमांगी कवी,  यांच्यासारख्या मातब्बर कलाकार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली,  सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्याविषयी मला प्रचंड आदर आहे,  त्याचप्रमाणे समीर पाटील यांच्याविषयी पण प्रचंड आदर आहे,  अभिजीत पानसे यांच्याबरोबर मी ” रेगे ” हा चित्रपट केला आणि समीर पाटील यांच्याबरोबर मी दोन चित्रपट आणि एक दोन मालिका केल्या , या दोघांच्या कडून मला खूप शिकायला मिळाले,  दोघेही छान पणे कलाकारांच्या कडून उत्तम काम काढून घेतात,  मी स्वतः दिग्दर्शक आहे,  त्यामुळे मला त्याची चांगली कल्पना आहे,  की दिग्दर्शकाला किती आणि कोणत्या गोष्टीचा टेन्शन असतं,  एकाच वेळेला किती अवधान सांभाळावी लागतात , आता माझी नुकतीच एक वेब सिरीज आलेली आहे , त्याचा दिग्दर्शक सचिन दरेकर हा माझा मित्र आहे ,, कलाकारांच्या वरती कोणतेही दडपण येणार नाही त्याची काळजी अभिजीत पानसे,, समीर पाटील आणि सचिन दरेकर हे दिग्दर्शक घेत असतात आणि त्यामुळे कलाकारांच्या कडून सुद्धा उत्तम अभिनय सादर करता येतो,,  मी नटसम्राट नाटक करत होतो , त्यामध्ये मोहन जोशी आणि रोहिणी हट्टंगडी,  हे कलाकार होते दोघेही मोठे कलाकार नावाजलेले ,,,, नटसम्राट नाटक हे ऋषिकेश जोशी यांनी दिग्दर्शित केलं होतं , मोहन जोशी आणि रोहिणी हट्टंगडी त्यांच्याबरोबर माझे काही प्रवेश होते हे प्रवेश करताना त्या दोघांनी मला खूप सांभाळून घेतलं , खूप मार्गदर्शन पण केलं,  ऋषिकेश जोशी यांच्या दिग्दर्शनात मधून मला खूप काही शिकता आलं कारण प्रत्येक दिग्दर्शकाचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो त्यांच्याकडून आपण सदैव काही ना काहीतरी शिकत असतो,,,

आजचा प्रेक्षक आणि आज तुझी होणारी धावपळ याविषयी तू काय सांगशील ?

       जोवर दोन माणसांची संवादाची गरज आहे तोपर्यंत नाटकाला मरण नाही,  आजचा प्रेक्षक सुद्धा खूप अप्रतिम आहे,  आम्ही जरी समांतर रंगभूमीवर  नाटकं करीत असलो, आणि आमची संस्था प्रायोगिक आणि समांतर रंगभूमी असल्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत आम्ही केलेल्या प्रयोगामध्ये कुठेही मला प्रेक्षकांची कमतरता भासली नाही,,,, त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीला,, समांतर रंगभूमीला, प्रेक्षक येत नाही असं कधी होणार नाही, हा प्रेक्षक दोन्ही रंगभूमीच्या पाठीशी उभा आहे याची मला खात्री आहे त्याचप्रमाणे व्यावसायिक रंगभूमीवरील उत्तम उत्तम येणाऱ्या नाटकांना सुद्धा तो  आवर्जून जातो आणि उत्तम दाद देतो ,,,,

      आजपर्यंतच्या धावपळ विषयी सांगायचे तर मला खूप चांगलं वाटतं,  पण आपण स्वतःहून निर्णय घेतलेल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात,  काम करतोय याचं मला खूप समाधान आहे , आणि त्यातून मला आनंद सुद्धा मिळत आहे ,,,,  2013 पर्यंत मी नोकरी सांभाळून नाटक केलं , त्यानंतर मी आता पूर्ण वेळ या क्षेत्रात कार्यरत आहे,  धावपळ ही होत असतेच,,, अभिनय कल्याण ,, या  संस्थेतर्फे होणाऱ्या नाटकं च्या निमित्ताने,, सातत्याने  धावपळ होत असते , आम्ही ”  घटोत्कच ” या नाटकाचे जवळजवळ वर्षभर प्रयोग सर्व ठिकाणी महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतभर  प्रयोग केले ,, नाटक करताना करताना जबाबदारी पण असते आणि बाहेरच्या  गावी प्रयोग करताना आपण मराठी नाटकाचे,, वेगवेगळ्या राज्यात,, वेगवेगळ्या महोत्सवात ,,प्रतिनिधित्व करीत असतो,  ह्याचा एक आनंद मिळत असतो,,  त्यामुळे ही धावपळ आहे,,पण ती हवीहवीशी वाटणारी धावपळ आहे आणि या धावपळीतून मला आनंद समाधान आणि ऊर्जा मिळत असल्याने मला थकवा कधीच येत नाही ,,,,

दीनानाथ घारपुरे ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.