जत | प्रकाश जमदाडे यांची कोरोना लढाईत गरजूंना मदतीचा हात
जत,प्रतिनिधी : रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याकडून जत तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, मास्क,कोरोनाच्या लढाईतील महत्वाच्या घटक असलेल्या गटप्रवर्तक, आशा वर्कर यांना हँडग्लोजचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
तालुक्यातील व्हसपेठ,निगडी,काराजनगी, घोलेश्वर,सनमडी, कुणीकोनूर,टोनेवाडी आणि खैराव परिसरातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.
जत तालुक्यातील जनतेच्या मदतीसाठी धावणारे प्रकाश जमदाडे हे कोरोना काळातही जनतेला आधार देण्याचे काम करत आहेत.